दिंडे किती दिवसात, वर्षात खाल्ली नाहीत. कणकेत पुरण भरून जशी दिंडे करतात तशी मोदकांसाठी उकड काढतो तशी उकड काढून त्यात पुरण भरुनही दिंडे करतात.
उंडे आणि शेंगोळ्याही कधी खाल्लेल्या नाहीत. आमच्याकडे दिव्याच्या अवसेला कणिक+गूळ घालून दिवे करतात. त्यात रवाळ साजूक तूप घालून खायला मस्त लागतात.
मांडे हुबळी धारवाड कडे अगदी सर्रास मिळतात, ते बरेच टिकत असल्याने पॅकेटे भरभरून आणले किवा मागवले जातात. :)
चकोल्या... अम्म्म! त्या तर एव्हरटाईम फेव्हरिट.. बरोबर लसणीची किवा दाण्याई चटणी हवी झणझणीत.. आत्ताच तोंडाला पाणी सुटले आहे, उद्याच करते.:)
स्वाती