भरदुपारी येत गेले मेघ काळे, चिंब पाउस-
-अन् उसासे खिन्न, आले त्या मिठीला पोरकेपण ॥
ही द्विपदी फारशी उलगडली नाही.
संधिकाली आजही येतात विस्कटले तराणे,
ओळखीचा स्वर, म्हणूनच ऐकतो गंधाळले क्षण ॥
ह्या द्विपदीतले प्रतिमाविश्व खालच्या ओळीत थोडे विस्कटल्यागत वाटले. क्षण गंधाळलेले का बरे असावेत? की केवळ पादपूर्तीसाठी गंधाळलेले आहेत? गंधाळल्या क्षणांना ऐकणे म्हणजे काय? हमने देखी है उन आंखों की महकती खुशबू सारखे असावे. असो. एकंदर छानच झाली आहे कविता.