डाळढोकळी किंवा दालढोकली हा गुजराती लोकांमध्ये होणारा पदार्थ असल्याने त्याची चवही जरा वेगळी असते. त्यात शेंगदाणे डाळीबरोबरच उकडतात व ते दालढोकलीचा अविभाज्य भाग असतात. शिवाय आमचूर पावडर, बडीशेप पूड व साखर वापरल्याने ह्या पदार्थाला आंबटगोड चव असते. पण बाकी कृती जवळपास चकोल्यांसारखीच!