मी स्वतः अनुभवले आहे. ( अगदी भजीच असे नाही, पण पुऱ्या वगैरे मी स्वतः ऐकत होतो. ) एका स्त्रीने मला हे स्वतःच्या पतीबाबत सांगीतले.
आज जवळजवळ २० वर्षांनी आठवले. आपल्या 'आवडले नाही' या मताचा अक्षरशः संपूर्ण आदर आहे व रसभंग झाला याबद्दल दिलगीरीही व्यक्त करतो.
मात्र, 'हा असा विषय' म्हणजे काय?
मृत्यू म्हंटले की घळाघळा रडलेच पाहिजे का? ते एक सत्य आहे. सगळ्यांच्या बाबतीत होणार आहे. विनोदाचा विषय का बनू शकत नाही?
लक्ष्या बेर्डे - आई, शेजारची मावशी गेली, तुला रडायला बोलवलंय ( हा एका चित्रपटातील 'विनोद')
( लक्ष्या बेर्डे माझ्या वैयक्तिक मतानुसार विनोदी नव्हता. )
चित्रपट, नाटके यात कित्येकवेळा मृत्यू हा विनोदाचा विषय म्हणून वापरला गेला आहे.
आपल्याला कदाचित सवय नसावी.