मिलिंदराव,
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.
हा शेर सुचताना मनात कल्पना अशी होती -
जगण्याच्या सुरुवातीलाच (कळत्या वयात) अनेक समस्या वाट्याला आल्या. मन मारावे लागले. प्रतिकूलतेत जगावे लागले. असा हा आयुष्याच्या प्रारंभकाळातच जन्माच्या नदीला आलेला दुःखांचा पूर ! सुरुवातीलाच असे अनुभव आल्याने जीव अद्याप तान्ह्या मुलासारखाच आहे. निष्पाप, न निर्ढावलेला, न सरावलेला, सुटकेचा मार्ग माहीत नसलेला...दुःखाचे पाणीच पाणी या जिवाला स्पर्शत होते...पण तो पूर काही ओसरत नव्हता...ओसरणार नव्हता. सुरुवातीलाच ही स्थिती; तर मग अजून आख्खे आयुष्य जायचे आहे... हा जीव पैलतीरी न्यायचा तरी कसा ?
जीव म्हणजे जणू काही कृष्ण आणि मी म्हणजे वसुदेव !पण वसुदेवाच्या आय़ुष्यात झाला तसा चमत्कार काही माझ्या आयुष्यात होणार नाही.