सुरेख कविता ........ आवडली !

ही पहाट फेडत जाते
तुझिया प्रीतीचे देणे
पूर्वेच्या वेशीवरती
किरणांचे धाडूनी मेणे

मग सरते रात्र विराणी
सूर्याच्या चुकवित नजरा
सोबतीस सोडून जाते
हा आठवणींचा गजरा!

खूपच छान ..!