मी काही हा कार्यक्रम पाहिलेला नाही. पण जे काही आत्ता वाचलं आहे त्यावरून साधारण तो कसा असावा ह्याची कल्पना करू शकतो. आपल्याकडली बदललेली मानसिकता या प्रकारच्या कार्यक्रमांना सोकावलेली आहे हे मात्र निश्चित. यामध्ये भाग घेतलेल्या व्यक्तीनी खरं तर विचारपूर्वक भाग घेतला पाहिजे. नंतर माझी खाजगी बाब सर्वांसमोर बोलावी लागली म्हणून गळा काढण्यात काय अर्थ आहे? या अश्या कार्यक्रमांमध्ये आणखी एक महत्वाची बाब म्हणजे बेमालूम नाटकीपणा. 'मी असं असं बोलेन तुम्ही आरड ओरडा करा' मग ही गोष्ट वर्तमानपत्रवाल्यांकडे पद्धतशीरपणे पोचवायची की आपसूकच कार्यक्रमाची भरमसाठ जाहिरात होते. प्रश्नकर्ता आणि उत्तर देणारा दोघानाही प्रसिद्धिच प्रसिद्धी.

यामुळे समाजव्यवस्थेला बाधा पोचेल म्हणजे नेमकं काय होईल? मुळातच ती बाधारहीत आहे असं तुम्हाला वाटतं कां ? पूर्वी अशा गोष्टी सर्वदूर पसरत नसत कारण तशी यंत्रणाच अस्तित्वात नव्हती. आता ती आहे. एवढाच फरक. साठी सेन्सर शिप वगैरे असण्याची काहिही आवश्यकता नाही.

तुम्ही ज्याला 'उन्मत्त' असा शब्द वापरला आहे तो कशा अर्थी ते माहित नाही. पण यात तुम्हाला उन्मत्तपणा कां वाटतो तेच कळत नाही. एक साधंसं उदाहरण देतो. मी राहतो त्याच ईमारतीमध्येच तीन दारू विक्री करणारी दुकानं आहेत. पण मी दारू पीत नाही. मला जे करावंसं वाटतं तेच मी करतो. मी तिथेच बाजूला असलेल्या पुस्तकांच्या दुकानात जातो.(म्हणजेच मी माझ्या रिमोटचा वापर केला.)

मुळातच 'सच का सामना' या नावांतच सर्व काही नाही कां आलं? तो सामना भाग घेणारी व्यक्ती करणार आहे. बघवणार नसेल तर खरंच पाहू नये. WWF कुस्त्यांमध्ये आणि या अशा कार्यक्रमांमध्ये काहिही फरक आहे असं मला तरी नाहि वाटत.