पाहिजे डोळ्यात अश्रू रोज एखादा तरी...
दुःख आहे रोजचे हे... कोरडे प्यावे कसे?
सारखा माझ्यातला मी सांगतो मज 'धाव तू... '
सारखी दमछाक! मी मजलाच गाठावे कसे?
प्रश्न दानाचा नसे हा... दानतीची बाब ही...
जे दिले नाहीस तू ते सांग मी घ्यावे कसे?
एकदाही नाव माझे घ्यायचे नाही तुला....
मी तरी आय़ुष्य हे केले तुझ्या नावे कसे? .... हे खूपच आवडले- प्रदीपजी, अपेक्षेप्रमाणॅ मस्त गझल !