मजा आली लेख वाचून.
अनेक छोट्या छोट्या गोष्टींना एकदम उजाळा मिळाला.
दीवाळीला मामाच्या गावी जातानाचे कोळश्याच्या इंजीनची रेल्वे (लेल्वे - झुक-झुकगाडी ) आठवली. - अगदी धूरांच्या रेषा हवेत काढणारी.
एखाद्या वळणावरून/ पुला वरून गाडी जात असताना इंजीन पाहण्यासाठी खिडकीतून बाहेर पाहण्याचा अट्टाहास करताना गरम गरम कोळश्याचे कण डोळ्यात गेलेले आठवले. त्यात आईची होणारी घालमेल आठवली. त्यानंतर होणारे लाड आणि नंतरचा आईचा राग देखील आठवला. गाडीत मिळणारी भेळ आठवली.
दीवाळीच्या दीवसांमधले ते बहीणींचे शेणाच्या पाण्याचा सडा मारणे / रांगोळी काढणे. तो जीलेटीन च्या कागदाचा रंगी-बेरंगी आकाश-कंदील माळदावर लावण्यासाठीची कसरत आठवली. तो तांब्याचा बंब , ती आजीची लगबग, मोती साबण, बदाम / आवळा तेल, दीवाळीचा फराळ सारं सारं समोरून गेलं. खरंच मामाच्या घरी साजरी केलेली प्रत्येक दीवाळी ही तर कायमचा ठेवा आहे.
बैलगाडीचे आकर्षण खूप होते पण १ दाच बसलो पण त्याची सुद्धा आठवण झाली. हुरडा पण एकदाच खाल्ला त्याची पण आठवण तरळून गेली.

खरंच ते दिवस आज मंतरलेल्या सारखेच वाटतात.
लिहीत गेलो तर जागा पुरणार नाही.
खरंच मजा आली लेख वाचून आणि लिहीले पण मस्त.
बपुढचा लेख पण येऊ देत लवकर (मु. पो. अमेरीका
)