ही हझल नाही. ही चांगली नर्मविनोदी, मिश्किलशी गझल आहे. माझ्यामते हझल ही अधिक बोचरी, हास्योत्पादक असते. ती थोडीशी ग्राम्यही असू शकते.
हा नवा कुत्रा असो वा तो नवा कुत्रा

शेवटी कुत्र्याप्रमाणे वागती कुत्रे
हा हझलचा शेर झाला. ह्याशिवाय आज बेडा पार पांडू! ही हझल वाचावी. सवड मिळाल्यास आणखी उदाहरणे देता येतील. मनोगतावर गझलांची विडंबने भरपूर होत असतात. त्यातील अनेक विडंबनांना हझल म्हणता येईल.