नाटका सिनेमात काम मिळवताना पदवी कधीच पाहिली जात नाही. तुमचा त्या क्षेत्रातला अनुभवच तुमच्या उपयोगाला येतो. कारण प्रत्येक नव्या कामाच्या वेळी तुमच्या कलागुणांचा कस लागतो. दरवेळी तुम्हाला स्वतःला नव्याने सिद्ध करावे लागते त्यामुळे पदवी असली काय नसली काय काही फरक पडत नाही.

माझ्या अनुभवातली दोन उदाहरणे सांगतोः

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डी. लिट जाहीर झाली तेव्हाच्या पदवीदान समारंभात बोलताना ते म्हणाले होते, "तुम्ही विद्यार्थी फार नशीबवान  आहात, तुमच्याकडे असलेले पदवी प्रमाणपत्र दाखवून तुम्हाला कोठेही नोकरी मिळू शकते. आमचे मात्र तसे नाही, पदवी मिळूनही आम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यक्रमात सिद्ध करावे लागते. " तीच गोष्ट सर्व सादरीकरणाच्या कलांसाठी लागू आहे असे मला वाटते.

दुसरे उदाहरण अभिनेता अतुल कुलकर्णीचे,

सहज गप्पा मारताना एन. एस. डी. (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) चा विषय निघाला आणि तो म्हणाला, "तुम्ही कोठूनही कितीही प्रशिक्षण घेतलेत तरी कष्ट चुकणार नाहीत. मी एन. एस. डी. तून आलो म्हणजे थोरच असलो पाहिजे असे अजिबात नाही तसे कोणी मानतही नाही. तुम्हाला काम मिळवण्यासाठी दहा हेलपाटे घालावे लागले तर मला सात घालावे लागतात एवढाच काय तो फरक. "

धन्यवाद !