अकबर आणि बिरबल (किंवा मुल्ला नसरुद्दीन किंवा तेनाली रामा) यांची एक वाचीव गोष्ट अशीः
एकदा असाच बाता मारणारा एक ज्योतिषी भविष्य आकलनाबाबच्या स्वतःच्या अकलेबाबत सगळ्या राज्यात माहोल निर्माण करतो. त्यामुळे वैतागलेला राजा (अकबर किंवा मुल्लाचा जो राजा असेल तो किंवा विजयनगरचा राजा वगैरे बिरबल/नसरुद्दीन/तेनाली यांच्या सल्ल्यानुसार) त्याला महालात बोलावतो आणि एक बकरी त्याच्यासमोर उभी करतो. आणि बकरीच्या बाजूलाच एक जय्यत खाटीक (किंवा कसाई) हातातला सुरा परजत तयार.
राजा त्या फोका मारणाऱ्या ज्योतिषाला बकरीचे आयुष्य कितपत राहिले आहे याबाबत काही माहिती विचारतो आणि जर ते भविष्यकथन असत्य ठरले तर ज्योतिष्याचे आयुष्यही कितपत राहिले आहे याबाबत काही शंका प्रकट करतो.
अर्थातच नाक दाबले की तोंड उघडते म्हणतात त्याप्रमाणे ज्योतिषी आपल्या बाता मारण्याच्या कलेबाबत कबुली देतो.
अशी ही मजेदार गोष्ट वरील चर्चाप्रस्ताव वाचून पुसटशी आठवली.