"या समाजाच्यापुढे हा प्रश्न आलेला नसावा

व्हायचे कोणी कुणाचे का कुणाच्या संमतीने?

आजही होऊन गेली वेळ येण्याची तुझी बघ
आजही आकांत केला लोचनांच्या आरतीने

जो स्वतःबाहेर केव्हाही नसावा पोचलेला
तो जगावा वा मरावा, काय मागावे सतीने?

माणसे होती तशी सच्ची मनाने, ठीक आहे
जायचे आहे कुठे पण.. लाभलेल्या सद्गतीने? "                       ... विशेष आवडले !