नीता,
आपले मत अगदी पटले.
या कार्यक्रमातून असल्या प्रश्नांना दिलेली उत्तरे कोणतेतरी 'पॉलिग्राफ यंत्र'* खरी-खोटी ठरवते. त्यातून गेलेल्या लोकांच्या आयुष्यात पुढे जी वादळे निर्माण होतील त्याची जबाबदारी कोण घेणार?
जर त्या स्त्रीला असला प्रश्न कोणी विचारलाच नसता तर ते गुपित(ते खरं आहे असं मानून) गुपितच राहिलं असतं, शेवटपर्यंत तिचा संसार सुखाचा झाला असता, समाजात एवढी नाचक्की झालीच नसती. अश्या या 'सच' चा 'सामना' करून नेमकं कुणाचं(निर्माते आणि वाहिनीवाले सोडून) भलं झालं? ना तिचं, ना तिच्या पतीचं, ना मुलांचं, ना समाजाचं... झालं ते नुकसानच जास्त!! काय गरज आहे या फालतूपणाची? वरून त्याला 'सच का सामना' म्हणून उदात्त रूप देण्याचा निंदनीय प्रकार!
---------------------
* 'पॉलिग्राफ यंत्र', जे नक्की काय आणि कसे काम करते हे सामान्य जनतेला माहिती नाही. ते यंत्र खरोखर स्वतः च्या नियमावलीनुसार निर्णय देते की मालिका-निर्मात्यांच्या आदेशानुसार हेसुद्धा पडताळून बघता येणार नाही. केवळ हे लोक सांगतात की त्या यंत्राला खऱ्या-खोट्याची जाण आहे म्हणून लोक विश्वास ठेवणार. आणि ठेवला तरी ते शेवटी यंत्रच, त्याची ऍक्युरसी १००% पेक्षा कमीच असणार. मग चुकीच्या निर्णयांचे काय?