शिवरायांवर रचलेले काव्य... येथे हे वाचायला मिळाले:
धन्य ! धन्य ! शिवराय जाहला धर्मरक्षणा अवतार ।
कपटभाव वळखिला खानाचा, केला त्याचा मग संहार ॥ध्रु०॥
चौक १
चंद्रराव मोरे ठार करविला, जावळी जोडली मुलखाला ।
बाई कर्हामड सुभे आदिलशाहाचे हळुहळु आले कबजाला ॥
बातमी कळली ही आदिलशहाला मोठी धडकी भरली त्याला ।
म्हणे "बडा सैतान मत्त हुवा ! क्या करना अल्ला ! अल्ला !! " ॥
आदिलशाहानं लौकर तेव्हां मोठा दरबार भरवीला ।
बडे अमीर उमराव जमविले कितिक हिंदु सरदारांला ॥
कर्नाटकांतुन जल्दी बोलावुन आणलं शहाजी राजाला ।
"धाक घालुन बापाला बंदोबस्त करिन"" आशा ही अल्लीला ॥
चाल
जरि होता ...
पुढे वाचा. : प्रतापगडचा रणसंग्राम (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर