शिवरायांवर रचलेले काव्य... येथे हे वाचायला मिळाले:
शिव छत्रपतीची कीर्ती । गाऊ दिनराती ।
येईल मग स्फूर्ती । जाई भयभीति सारी विलयाला ! ॥
बाळपणीं झेंडा उभा केला । स्वराज्याचा पाया घातला ।
मावळा जमविला । धन्य जगिं झाला ! ! ॥ध्रु०॥
चौक १
एके दिशीं शहाजी शिवबाला । बोलला, "चल बाळा । जाऊ दरबाराला ॥
जाऊ चल बादशाच्या भेटीला । थाटमाट मोठा बघ बाळा ! ।
बघुन होईल थंड तुझा डोळा । म्हणून ठरविला । बेत या वेळा" ॥
"चला, बाबा !" बाळ बोलला । पोशाख केला । गेला दरबाराला ।
पाहिला बादशहाचा मोठा दरबार । बसले होते कैक अमीर सरदार ।
शाहाचा होता मोठा परिवार ! ॥ हत्तींच्या सोंडांनी भले । ...
पुढे वाचा. : शिवप्रतिज्ञा (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर