शिवरायांवर रचलेले काव्य... येथे हे वाचायला मिळाले:
चौक १, चाल : मिळवणी
चारी खंडांत झाले बहुवीर, पराक्रमी धीर, त्यांत रणशूर,
सर्वांहुनी श्रेष्ठ शिवाजी खास । षड्गुणैश्वर्य संपत्ती ज्यास ।
म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥ध्रु०॥
औदार्य आणि सत्कीर्ति, विज्ञानस्फूर्ती, वैराग्य वृत्ती,
गुण हे प्रभूवीण नसे कवणास ।
शिवाजीच्या ठायीं दिसती आपणास ।
म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥
सर्वदा जयाला यश, कधीं न अपयश,
सकळ जन खूष, कार्यामध्यें विघ्न नसे मुळीं ज्यास ।
दहशत पडली यवन राज्यास ।
म्हणून अवतारी ...
पुढे वाचा. : छत्रपती शिवाजी अवतारी कसे ? (पोवाडा) - शाहीर रामचंद्र शंकर दळवी