... एकत्र आले आहेत.. केवळ पाश्चात्यांचं अनुकरण म्हणून कोणी आपला सेक्शुअल प्रेफरन्स बदलणार नाही. हा आरोप फारच उथळ आहे. इथे कुठेही ह्या प्रश्नाचं उदात्तीकरण वगैरे चालू आहे असं वाटत नाही. फक्त प्रश्न ताणला गेल्याने त्यावर अधिक चर्चा झाली आणि जे 'जिंकले' त्यांनी तो विजय साजरा केला एव्हढंच. मुळात आपल्यापैकी कोणी कधी आपल्या समाजात किती गे आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केलाय का? मी केलाय. इंटरनेट वापरून. फक्त पुणे शहरात किती गे आहेत हे कळल्यावर चाट पडलो. आता एव्हढे समलिंगी आहेत म्हटल्यावर त्यांना त्यांच्या हक्कासाठी भांडाव लागणारच ना. सलील वाघांनी ह्या प्रश्नाचा संबंध एकत्र कुंटुंब व्यवस्थेशी वगैरे का लावलाय?