ही माझ्यासाठी अशी जागा आहे जिथे 'व्यवसायाचे निमित्त' नसेल तर मी जाणार नाही. गेल्या साडे तीन वर्षात व्यवसायाचेही निमित्त आलेले नाही. त्यामुळे, मी सुखात आहे.
मुंबईचा चेहरा साऱ्या देशाला चेतना देऊ करतो हे पटत नाही.
मराठी माणसांना मुंबई सांभाळता आली नाही म्हणून 'मुंबई देशाची' वगैरे संज्ञा चिकटल्या आहेत. ( देशाची आर्थिक राजधानी आहे हे माहीत आहे व अर्थातच मान्य असणारच! )
एकदा असेच कुणाला खालील शहरे 'देशाची', 'देशाला चेतना देऊ शकणारी' वगैरे करता येतील का यावर विचार व्हावा.
चेन्नई
अहमदाबाद
हैदराबाद
जयपूर
( हे लिहिण्याचे कारण इतकेच की या शहरांमध्ये परभाषिक जाऊन प्रचंड मोठ्या प्रमाणावर पिढ्यानपिढ्या राहणे हे खूप अवघड आहे. मुंबईत ते जमण्याचे कारण म्हणजे मुंबई हे नुसतेच बंदर नसून ते 'महाराष्ट्रात आहे, जिथे मराठी लोक राहतात, ज्यांना परभाषिक लोक आले तरीही आधी फायद्यासाठी सामावू घेण्याची व नंतर बोंब मारण्याची कला अवगत आहे. )
"आता मुंबईची भीती वाटत नाही" हे विधानच माझ्यासाठी रामसे चित्रपटासारखे भीतीदायक आहे.
मुंबईतली गर्दी, धकाधकी.. सार काही आपलं वाटत. सहवासाने व्यक्ती, वस्तू,
ठिकाणाबद्दल जिव्हाळा निर्माण होतो त्यामुळे असेल. पण कशीही असली तरी
मुंबई आपली वाटते. म्हणूनच कोणी कधी विचारलंच तर "मी मुंबईकर" असे सहज
ओठांवर येऊन जातं.
सहवासाने प्रेम निर्माण होते हे मान्य आहे. काही काही कैदीही सुटल्यानंतर जेल शेजारीच टपरी टाकून उपजीविका करतात अशी मध्ये बातमी आली होती. तसेच, मनोरुग्णांना बरे झाल्यावरही रुग्णालयच आवडत राहते. तेव्हा सहवासाने प्रेम निर्माण होते हे मान्य आहे. ( परवाच एका इमेलमध्ये हेही वाचले की हिटलरच्या कैद्यांना गॅस चेंबरच आवडायचा. धरून बाहेर काढले तरी माणूस आतच धावायचा. )
सौरभ यांच्या "मस्त लिहिलंय" या मताशी मात्र पूर्ण सहमत! मुंबईबद्दल इतके विनोदी लिखाण वाचनात आलेले नाही.
आजच वाचलेली एक इमेलः ( पुण्याचे लोक किती बुद्दू असतात याबाबत ती इमेल होती. )
एक पुणेकर मुंबईत जातो. त्याला माटुंग्याला जायचे असतानाही अज्ञानाने तो फास्ट लोकल घेतो. आत जाऊन अज्ञान प्रकट करतो. एक सरावलेला मुंबईकर मदतीला धावतो व सल्ला देतो की 'माटुंग्याला लोकल थोडी हळू होते. तुला उतरता येईल. मात्र, एक पक्के मनात ठेव. उतरल्यावर थांबायचे नाही. पळत राहायचे.' यात तो मुंबईकर पळत राहायचे हे ठासून सांगतो कारण त्याला अर्थातच शात्रीय कारण आहे.
माटुंग्यापाशी तो पुणेकर व्यवस्थितपणे 'धावत्या पण बऱ्यापैकी हळू झालेल्या' लोकलमधून उतरतो वा धावत राहतो.
मात्र, तो एक चूक करतो. तो लोकलपासून दूर दूर न धावता लोकललाच समांतर धावत बसतो. लोकल अजून थोडी हळू होते व माणूस स्वतःचा वेग तेव्हढाच ठेवतो. यामुळे तो लोकलच्या पुढच्या दारापाशी पोचतो. त्याचा एकंदर वेग व आविर्भाव पाहून पुढच्या दारातील लोकांना हा 'चढू पाहत आहे' असे वाटते व ते जबरदस्तीने त्याला पुन्हा ट्रेनमध्ये ओढून घेतात. हे पाहून मागचे मुंबईकर खो खो का काय म्हणतात तसे हासतात व पुढचे मुंबईकर गडाबडा लोळतात. तो बुद्दू पुणेकर रागावतो.
मीही हे वाचून मनापासून हासलो. मात्र, नंतर विचार केला की जीवनाने जी थट्टा केली आहे ती पुणेकरांची केलेली नसून मुंबईकरांची केलेली आहे. मुंबईकरांना असे उतरणे, चढणे हे अंगी बाणवावे लागते. ते न जमणारा परकीय विनोदी ठरतो. पण मजबुरी कुणाची असते? ... मुंबईकरांची!