पहिली ओळख हीच शेवटची ओळख असं म्हणतात खरं.. ती म्हण परत एकदा तपासून घेतली पाहिजे नाही..? तसंही पहिल्या भेटीत, पहिल्या नजरेत.. सगळं कुठे दिसतं..!

- खरंय...असं कधी नसतंच. माणसं, गावं, ठिकाणं टप्प्याटप्प्यानंच कळतात, उलगडतात किंवा अजिबातच कळतही नाहीत किंवा उलगडतही नाहीत !
...............
एकूणच, लेख आवडला. डाग शब्दाचा असा वापरही खूप दिवसांनी वाचायला मिळाला. खास गावठी शब्द आहे हा ! नग, बरोबरचे सामान-सामग्री यातील रुक्षपणा या शब्दात नाही.
लेखाचा सूर पाहता, शीर्षक मात्र खटकले. एकीकडे म्हण तपासायला  हवी, असे मत असेल तर...मग सध्याचे शीर्षक वेगळे हवे होते.
...............
मुंबईच्या पहिल्याच भेटीत दिसलेला नाक नसलेला भिकारी आणि कालांतराने जाणवलेली, दिसलेली नाकेली मुंबई...हा संदर्भही आवडला.
...............
पुढील गद्यलेखनाला मनापासून शुभेच्छा.