लेख छान आहे. मात्र

ही माझ्यासाठी अशी जागा आहे जिथे 'व्यवसायाचे निमित्त' नसेल तर मी जाणार नाही. गेल्या साडे तीन वर्षात व्यवसायाचेही निमित्त आलेले नाही. त्यामुळे, मी सुखात आहे.

हे माझ्यासाठीही खरे आहे. शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत घालवलेले काही घामट दिवस आणि रेलवे स्टेशनाबाहेरच्या मार्केटमधला सडलेल्या भाज्यांचा वास एवढीच माझ्यासाठी 'आपल्या' मुंबईची आठवण. (हे इ.स. १९९६ पूर्वी) नंतर १२ वर्षांत मोजून तीनदाच एकेक दिवसासाठी गेलो. प्रत्येक वेळी अतोनात गर्दीचा त्रास वाढत्या श्रेणीने सहन करावा लागला. पुणे वगळता निवडीस वाव असल्यास 'आपल्या' मुंबईपेक्षा बंगळूर, हैद्राबाद, चेन्नै वगैरे राहायला कधीही पसंत करीन.

देशाचे जाऊद्या मुंबई मलातरी चेतना देऊ शकेल असे वाटत नाही. बाकी आर्थिक राजधानी वगैरे... हम्म.