सलील वाघ हे एकंदरीत चांगलेच गंडलेले आहेत असे ह्या लेखातून दिसून आले.

 'समलिंगी लोक' आणि 'भारतातील ज्येष्ठ नागरिक अमेरिकेला जाणे' ह्याचा बादरायण संबध मला तरी अनाकलनीय आहे त्यामुळे पहिले एक दोन परिच्छेद (सदर विषया संदर्भात)टाकाऊ आहेत (माझ्या मते).  

त्यापुढे वाघ म्हणतात..

प्रत्येक व्यक्तीत समलिंगी प्रेरणा क्षीण प्रमाणात असतातच.

हे मात्र कशाच्या जोरावर वाघांनी ठोकून दिले आहे समजले नाही.

जे पूर्ण विषमलिंगी असतात त्यांना समलिंगी/पुरुष आकर्षण ह्या विचारांनी किळस येते. जगण्याच्या ओघात त्याचे दमन वगैरे करावे लागत नाही.   

अपघात आणि आपत्कालीन व्यवस्था म्हणून समलिंगी संबंधांनाही एक कोपरा राखून ठेवला गेला आहे.

ह्याचा अर्थ काय? कसला अपघात आणि कसली आपत्ती?

चेकाळलेल्या मिडीयामुळं तर भिन्नलिंगी आकर्षण असलेल्या आमच्यासारख्यांना जणू तोंड चुकवायची वेळ येते की काय, इतका अपराधीपणा आला.

ही असली हास्यास्पद विधाने पाहून  प्रतिवाद तरी काय करायचा??

(विषयांतर वाटलेला भाग वगळला. : प्रशासक)