खाद्यसंस्कृती हाही शब्द चालू शकेल.
पण संस्कृती हा शब्द सर्वसमावेशक आहे. साउथ इंडीयन खाद्यसंस्कृती (पानातल्या) ५-६ पदार्थात संपत नाही. तसेच केळीच्या आडव्या पानावरील जेवण साउथ इंडीयन खाद्यसंस्कृतीत अभिप्रेत असते पण  Cuisine मध्ये फक्त पदार्थ अभिप्रेत असतात. वाढण्याच्या पद्धती, जेवणाच्या पद्धती त्यात अभिप्रेत नसतात असे मला वाटते.

पाककृती शब्दच बरोबर आहे असा माझा आग्रह नाही.

पाककृती म्हणजे एखादा पदार्थ बनविण्याची कृती. हा शब्द इंग्रजी 'रेसिपी' ह्याचे भाषांतर म्हणता येईल.

इथे पुन्हा 'नाम' आणि 'क्रियापद'चा गोंधळ आहे. 'पाककृती' शब्दाची दोन्ही रुपे आहेत. मी 'पाककृती' हे 'नाम' या अर्थी वापरलेले आहे.