मी आपला प्रतिसाद समजू शकते..
मी ज्या दिवशी मुंबईत आले होते त्या दिवशी .. जर मी काही लिखाण केले असते तर ते काहीसे असेच असते. पण गर्दी, गटार, धावपळ, यांच्या पलीकडे ही मुंबई आहे हे मुंबई जवळून पाहिल्यावरच कळते. जे आपल्या बाबतीत झाले नसावे.
बाकी पहिले मत बदलण्यासाठी मनाची दारे उघडी असावी लागतात. ती तशी ठेवलीत तर मुंबईची महती तुम्हालाही कळेल.
तूर्तास तुम्हाला न आवडणारी मुंबई मला आवडू शकते हे समजून घेतलेत एवढे पुरेसे आहे. :)