सलील वाघांची इ-मेल वाचून माफक करमणूक झाली. यापूर्वीही त्यांनी 'अभिधानंतर'मध्ये लिहिलेल्या एका लेखात आणि भाषणात विंदा करंदीकर, सुर्वे आणि महानोरांना यांना संदीप खरे, सुधीर मोघेंच्या मांदियाळीत बसवणे; स्वतःभोवती आणि इतर नवकवींभोवती दिवे ओवाळून घेणे; विंदांना ज्ञानपीठ मिळाल्यामुळे मराठी समाज वीस
वर्षे मागे गेला यासारखी विधाने करणे इत्यादी लीळा केल्या होत्याच. तेव्हा एकंदरीत वडाची साल पिंपळाला जोडण्याचा आणि तथाकथित अपप्रवृत्तींचे दमन करण्याचा प्रकार पाहून याही प्रांतात त्यांचे म्हणणे फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही हे स्पष्ट झाले.