लेख प्रवाही आहे हे पटले. परंतु मूळ मुद्याशी कोलबेर यांच्या अनधिकृत लैंगिक शिक्षणाचा संबंध काहीही नाही. स्मगलिंगचा उच्चार समलिंग असा होणे, बिस्तरपे लडकी हा शेर वर्गात उच्चारला जाणे व दोन दिवट्यांनी मास्तरांना काही प्रश्न विचारणे याचा कोर्टाने दिलेल्या निकालाशी संबंध नाही. ते कोलबेर यांचे खासगी आयुष्यातील अनुभव होते ज्याचा अनावश्यक उपयोग हा मुद्दा मांडताना केलेला आहे असे वाटते.

बाकीः

१. लाल पिवळी वायर हा एक अंदाज आहे. या अंदाजाला काहीही अर्थ नाही.
२. वायरिंग लोचा हे शीर्षक तर या लेखाला मुळीच शोभत नाही, पण ते लेखकाचे स्वातंत्र्य! लेखकाने 'फ्रान्समधील जिवाणूंची झपाट्याने वाढ' असे शीर्षक दिले तरी कुणी काही म्हणू शकत नाही.
३. संजोप रावांचे सुरुवातीचे मुद्दे हे मूळ मुद्दा सांगतानाची पार्श्वभूमी म्हणून उद्धृत झालेले असले तरी लांबले असे वाटले. बरेच वर्षे ते लोक दर्यावर असल्यामुळे तिथे स्त्रिया कुठून येणार हे मत पटले नाही. तुरुंगामध्ये हा प्रश्न कैद्यांना भेडसावतो, त्यामुळे समलिंगी संभोग तुरुंगात आढळू शकतो हे ठीक! पण लोक बरेच वर्षे समुद्रावर होते या विधानात सगळेच लोक समुद्रावर होते असे काहीतरी भासते, ते नक्कीच तसे नसावे. सगळेच पुरुष समुद्रावर व सगळ्याच स्त्रिया जमिनीवर असतील तर समलिगी सेक्स अस्तित्वात यायला निश्चीतच वाव असेल, पण मग पुढची पिढी तयार कशी होणार? की तेवढ्या पुरते स्त्री पुरुष एकमेकांना भेटायचे अन मग परत समलिंगी सेक्स करायला जायचे?
४. सौरभ २००९ यांच्याशी पूर्ण सहमत आहे.
५. चक्रपाणी यांच्याशीही पूर्ण सहमत आहे की हा कुठलाही आजार नाही, हा निसर्ग आहे.
६. कोलबेर यांच्या या विधानालाः

'मास्तर रंगात येऊन डिटेल्ड शिकवायचे व वर्गात छान छान पोरी असायच्या या दोन कारणांमुळे कधीही क्लास चुकवला नाही'

या विधानाला माझा तीव्र आक्षेप आहे.

यातून 'एंबरॅसिंग मनस्थितीतील मुलींना न्याहाळणे' हा एक हेतू स्पष्ट होतो, जो माझ्यामते मनोगत सारख्या ठिकाणी शोभणारा नसून 'डेबोनेर ब्लॉग' या ठिकाणी मांडलेला शोभतो. हा समलिंगी भोगाला संमती मिळाल्यावर जल्लोष करण्यापेक्षा जास्त मोठा प्रश्न आहे.