प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रकृती आणि पुरुष ही तत्त्वे थोड्या फार फरकाने आढळून येतात हे जर गृहित धरले,
तर स्त्रीत्चाची प्रेरणा, म्हणजेच शरीराने पुरुष असलेल्या व्यक्तीतील प्रकृती हा फॅक्टर असावा असे वाटते.
ह्या पुरुष आणि प्रकृतीच्या कमी-अधिक प्रमाणामुळे, कधी कधी एखादा पुरुष जास्त संवेदनशील असतो, किंबहुना थोडासा बायकी असतो, आणि एखादी स्त्री ही जास्त कणखर (मनाने) असते, अशा मुलींना टॉमबॉय असे म्हणतात असे ऐकले आहे.
वरील वाक्यात, "स्त्रीत्वाची प्रेरणा वाढवून पुरुषत्वाचे दमन करायचे" असे काहीसे वाक्य असल्यामुळे, "स्त्रीत्वाच्या प्रेरणा" म्हणजे पुरुषामध्ये असलेलं प्रकृती ह्या तत्त्वाचं प्रमाण असावं असं वाटतं.
ते सगळं जाऊ द्या हो, पण ह्या कायद्यामुळे मला माझी प्राणप्रिय भिकबाळीही काढून टाकावी लागेल की काय अशी भीती आहे.
आधी कुणी माझ्या भिकबाळीकडे पाहिलं, की मला भारी वाटायचं, पण आता कुणी पाहिलं की हे लोक माझ्याकडे वेगळ्याच संशयाने बघताहेत असं वाटतं