उगाच शहराशहरांतील वाद उकरून काढण्यापेक्षा कधीही उत्तम
अगदी खरे आहे. मुंबई मला आवडत नसली आणि मुंबईकरांच्या माणुसकीचे नमुने नियम नसून अपवाद आहेत, असे माझे (वैयक्तिक) मत असले तरी लेख मला फार आवडला. लेखनामागच्या भावना सच्च्या असल्या की मग त्याला भाषेची कलाकुसर लागत नाही, हे सांगणारा लेख. सरदारजीची आणि गुजराथी माणसाची चित्रणे हुबेहूब. (सरदारजी एकूणच मनमिळाऊ आणि 'लायन हार्टेड' असतात असे माझे मत आहे)
'भारत के नौजवान थक गये' ही टवाळी फारच सभ्य आणि 'इंटुक' म्हणावी लागेल. (हा काळही जुना आहे म्हणा! ) हल्ली इतकी निर्भेळ थट्टाही दिसत नाही.
एकूण अपेक्षा ठेवाव्या असे वाटणारे लिखाण. आपण लिहीत राहावे, सुधीरजी.
(अवांतरः 'मनोगत' दिवाळी अंकासाठी असेच चुरचुरीत लिहावे ! )