मी स्वतः मुंबईची आहे. मला माझी मुंबई प्राणप्रिय आहे. पण माझ्या सासरी मात्र मुंबईला नावे ठेवणारी माणसेच भेटली. मला आश्चर्य याचे वाटत आले की इथल्या प्रत्येक माणसाला मुंबईला वाईटच माणसे कशी काय भेटली. (माझे सासर नागपूरला आहे.) इथल्या कोणालाही मुंबईत चांगली माणसे का बरे भेटली नसावी?