"ज्योतिष हे शास्त्र आहे किंवा नाही, हा वादाचा भाग असेलही कदाचित"

काहीतरीच काय? एखाद्या गोष्टीला जेंव्हा दोन बाजू असतात तेंव्हा तो वादाचा मुद्दा असतो. वेळ, ग्रहस्थिती ई. चा मानवी आयुष्यावर परिणाम हेच मुळात ईलॉजिकल आहे. मग उगाच एव्हड्या वर्षापासून आहे, स्टॅटिस्टीकली प्रुव्हन (?) वगैरे म्हणून ते शास्त्र ठरत नाही.
काही वर्षापुर्वी सोलपूर वृत्त दर्शन वर एक वादविवाद पाहिला होता. त्यात समस्त ज्योतिशविशारद मंडळी विरुद्ध नरेंद्र दाभोळकर वगैरे होते. त्या वादा-वादीत ज्योतिशविशारद लोक नेहमीप्रमाणे गुळमुळीत उत्तरे देत होती. कोणतही ठोस विधान करायला तयार नव्हती. शेवटी एकाने सांगितलं की मी आत्ताच्या आत्ता शंभर पत्रिका आणतो. त्यातल्या तुम्ही फक्त कोण जिवंत आणि कोण मृत आहेत तेव्हडे सांगा. पन्नास पेक्षा जास्तं बरोबर उत्तरं आली तर आम्ही मान्य करू. आणि मी स्वतः ज्योतिशविद्येचा प्रसार करेन!
पण मग त्यातही, पत्रिकाच जर चुकीच्या असतील तर वगैरे भाषा सुरू झाली. :-)