कांदळकरसाहेब,

फारच छान लेख. जणू काही तुमच्यासमवेतच होतो मी त्या त्या ठिकाणी !
------
जयवंत दळवी यांनीही त्यांच्या आठवणींतून मुंबई अशीच जागवली आहे...त्यांनी खासकरून दादरवर लिहिले आहे. 'दादरचे दिवस' या शीर्षकाचा त्यांचा हा अतिशय सुरेख लेख प्रथम एका दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता. नंतर तो त्यांच्या एका पुस्तकात
(बहुदा 'आत्मचरित्राऐवजी' या पुस्तकात) समाविष्ट आहे. कदाचित तुम्ही तो वाचलाही असेल. वाचला नसेल तर जरूर जरूर वाचा. निखळ समाधान हा लेख तुम्हाला देईल.
------
जाता जाता ः मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणांची नावे मला फार फार आवडतात...गेल्याच महिन्यात मित्रामित्रांमध्ये चर्चा करताना ही नावे मी आठवत होतो....झावबाची वाडी, ठाकुरद्वार, शिवडी, बोरीबंदर, मालाड, भाईंदर, वांद्रे, माटुंगा...इत्यादी. आणि आज हा लेख वाचनात आला...!
------
असो. एक छान लेख वाचायला दिलात. मनापासून धन्यवाद. 
------