* उगी खेचुनी न्यायचे एक नाते
टिको ही अपेक्षाच नाही अताशा
वा ! शेर आवडला. ("टिकावे.. अपेक्षाच नाही अताशा " असा संदिग्ध झाला असता का? "टिकावे असा मोह नाही अताशा " असे काहीसे?) (तसेच मला उगी/उगा बद्धल शंका आहे. इथे का कुणास ठाऊक मला "उगा" हवे होते असे उगाच वाटते आहे :-) हा फक्त प्रांतानुसार (? ) बदललेला शब्द आहे की त्याला खरंच काही सिग्निफिकन्स आहे? कुणी सांगेल का कृपया??)
* उशीला अता काम निम्मेच आहे
फुलांना नसे काम काही अताशा
सानी मिसरा सुंदर आणि ओघवता आला आहे. उला मिसऱ्याबद्दल मी साशंक आहे. पण विचार करून (सुचला तर ) पुन्हा एकदा लिहीन. ढोबळ सांगायचे झाल्यास उला मिसरा सगळेच सांगून टाकतो आहे असे वाटले.
* जुनी स्वप्न सारी खरी होत गेली
छळे का तरी पूर्तताही अताशा?
विचार सुंदर आहे. स्वप्न / स्वप्ने चं गालबोट लागायला नको होते असे वाटले. पण एकंदरीत गझलमध्येच वृत्तामुळे झालेली कुचंबणा जाणवते आहे.
चू. भू. दे. घे.
शुभेच्छा