'स्मृतिचित्र' रेखाटण्याचा हा प्रयत्न चांगला आहे; पण तो प्रयत्नच. अधिक भरघोस, ठाशीव, ठसठशीत असे काहीतरी लिहायला हवे.
तुमचे हे लेखन म्हणजे, एखाद्याने काहीतरी बोलावे-बडबडावे; पण त्याला काय म्हणायचे आहे, ते समोरच्यापर्यंत पोहोचूच नये, अशा धर्तीचे झाले आहे. 

हे सांगताना, तुम्हाला नामोहरम करण्याचा अजिबातच हेतू नाही. तसे समजू नये. उलट, आठवणी सांगण्याची तुमची ही जी ऊर्मी आहे, तिला नीट आकार मिळावा, एवढेच.


अत्यंत महत्त्वाचे ः शुद्धलेखनाकडे आवर्जून लक्ष द्यावे.