प्रतिसादाबद्दल व स्पष्टतेबद्दल!

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------


("टिकावे.. अपेक्षाच नाही अताशा " असा संदिग्ध झाला असता का? "टिकावे असा मोह नाही अताशा " असे काहीसे?) (तसेच मला उगी/उगा बद्धल शंका आहे. इथे का कुणास ठाऊक मला "उगा" हवे होते असे उगाच वाटते आहे :-) हा फक्त प्रांतानुसार (? ) बदललेला शब्द आहे की त्याला खरंच काही सिग्निफिकन्स आहे? कुणी सांगेल का कृपया??)

टिकावे असा मोह नाही अताशा छान वाटले. अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. मी घाई करतो हे मला माहीत आहे. 'उगी / उगा' याहीबाबतीत मी विचारही केला नाही व खरे तर मला त्यातील छटांचा फरक फारसा माहीतही नाही. सुचवल्याबद्दल आभारी आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

ढोबळ सांगायचे झाल्यास उला मिसरा सगळेच सांगून टाकतो आहे असे वाटले.

खरे आहे. हेही मी पाहिले नाही.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वप्न / स्वप्ने चं गालबोट लागायला नको होते असे वाटले. पण एकंदरीत गझलमध्येच वृत्तामुळे झालेली कुचंबणा  जाणवते आहे.

स्वप्न चे स्वप्ने व्हायला हवे आहे हे खरे आहे. मी घाईघाईत बोलीभाषा वापरून गेलो.

गजलमध्ये वृत्तामुळे झालेली कुचंबणा जाणवत आहे या मताचा पूर्ण आदर आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माझी काही मतेः

१. मी रचना प्रकाशित करतो तेव्हा मी खरच रचनेच्या अभिव्यक्तीकडे किंवा इतर घटकांकडे फारसे पाहत नाही. याचे कारण मला घाई असते असे नसून मला त्यापेक्षा जास्त काही जमतच नाही. इथे प्रतिभेच्या पातळीतील फरकाचा प्रश्न असावा. एखादा कवी खूप तयारीने शेर / कडवी घोळवेल, त्यावर सर्व बाजूने व वेगवेगळ्या वेळांना विचार करेल, स्वतःच असमाधानी राहील, असे मला जमतच नाही. मला एखाद्या क्षणी असे वाटते की यापेक्षा मी या शेरात / कडव्यात काही जास्त करूच शकणार नाही.

२. मला असेही वाटते की उत्स्फुर्तपणे जे सुचते ते तसेच मांडणे व त्यावर अभ्यासपुर्वक संस्कार करणे यातील उत्स्फुर्तता जास्त महत्त्वाची आहे. मात्र, हे अर्थातच वैयक्तिक मत असून ते बरोबर असेलच याची मला खात्री नाही.

३. मी रचना प्रकाशित झालेली नसली तर नैसर्गिकरीत्याच असमाधानी राहणारा व प्रसिद्धीसाठी कविता करणारा माणूस आहे, हे माझे अत्यंत प्रामाणिक मत मी इथे जाहीरपणे मांडत आहे. यापुर्वी प्रत्यक्ष भेटीत मी हे तुलाही, तसेच आणखीन काही जणांनाही सांगीतलेले आहे. मी हे खरोखरच लिहीत असून उपहासाने म्हणत नाही. त्यामुळे, माझी कविता ही विशेष संस्कार न करता व नियमीतपणे प्रकाशित होताना दिसते. हे जर खरे नसते तर माझ्याकडून 'चंदा एक शरीर, एका बापाची कथा, जिणे शवाहुनीच त्रस्त जाहले असे तिचे, गार जाहला चहा, साधासुधा जमाना, कामवाली, कारगिल, स्वामी' अशा कविता प्रकाशित झाल्याच नसत्या. त्या फक्त एकाच कारणासाठी मी प्रकाशित केल्या आहेत की 'आज रोजी' माझी एकतरी कविता प्रकाशित झाली हे समाधान मला मिळावे. मी पुन्हा स्पष्टपणे व पूर्ण गंभीरपणे लिहीत आहे की मी कविता ही फक्त आणि फक्त प्रसिद्ध होण्यासाठीच करतो. माझ्या कुठल्याही कवितेने मला कुठलाही मानसिक आधार वगैरे अजूनपर्यंत तरी दिलेला नाही. जसे कुसुमाग्रजांची कणा ही कविता वाचून इतरांनाही बळ मिळते, तसे मला माझ्याही कविता वाचून काहीही मिळत नाही. हां! माझे 'कवित्व' ( म्हणजे सध्या - कविता करण्याची व सादर करण्याची क्षमता ) यामुळे मला बरेच काही मिळाले. पुरस्कार, वर्तमानपत्रात नाव येणे, पैसे, आदर-सत्कार वगैरे गोष्टी! माझ्यासाठी त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण माझा मूळ उद्देशच प्रसिद्ध होणे हा आहे. (कवितेमार्फत - येनकेन प्रकारेण नव्हे! ). मला तर असे वाटते की मला माझी कविता काहीही देत नसून मीच कवितेला काहीतरी देत आहे. ( माझा वेळ, काही वेळा पैसे, कवितांच्या संख्येत भर वगैरे). अर्थात, ही माझी मते सत्य आहेत यावर विश्वास बसेल असा मला विश्वास वाटतो.

प्रतिसादाबद्दल खरच मनापासून आधार!