निरुपद्रवी 'डे' साजरे करायला काय हरकत आहे? रोजच्या कामाच्या रहाटगाड्यातून थोडीशी उसंत घेऊन ज्यांना या 'डे'ज् च्या निमित्ताने आनंद लुटायचा आहे त्यावर उगाच विरजण का ओतावे?

आपल्या (जवळपास सगळ्याच) संस्कृतींमध्ये सण/उत्सव हे ज्या कारणासाठी साजरे केले जातात त्याच कारणासाठी हे 'डे' आहेत असं वाटतं.

'व्हॅलेंटाईन डे' सुद्धा मला निरुपद्रवीच वाटतो. त्याला ज्या कारणापोटी एवढा तीव्र विरोध केला जातो त्या गोष्टी एरवीदेखील होतच असतात, फक्त 'व्हॅलेंटाईन डे'ला होतात असे नाही!