शब्द,  अर्थ, अलंकार वृत्त अशा सगळ्यासगळ्यांनी समृद्ध अशी तुमची कविताच खऱ्या अर्थाने परिपूर्ण आहे

विशेषतः

अवतीभवती नाचून गेले,
बोलबोलुनी घुमून गेले,
चित्र सरकले वर्णांचे;
आर्त राहिले, शून्य राहिले, उगाच अक्षरचिह्नांचे॥

ह्या ओळी पुढे अनेक दिवस माझ्या 'अवतीभवती' नाचत राहणार आहेत बहुधा.

खूप सुंदर. असेच लिहीत चला.