आपल्या सर्वांच्या सहकार्याने माझ्या भौगोलिक ज्ञानात भर पडली. त्याबद्दल धन्यवाद. पदार्थ कुठला? यापेक्षा तो कसा आहे हे मी जास्त सखोल बघते. आणि लगेच शिकून घेते. "आम खानेसे मतलब रखती हू! गुठलीया गिननेसे क्या मिलेगा." पदार्थ करून बघा. आपल्या पाककलेच्या ज्ञानात काही भर पडेल.
काय आहे ना मित्रांनो आपण मराठी आहोत हे चांगल्या गुणांनी दाखवून दिले तर बरे असते. तुम्ही छिद्र्न्वेषी मराठी आहात ते मात्र अगदी व्यवस्थितपणे दाखवून दिलेत. हे बाकी चांगले केले. खरं तर हा फार चांगला गुण आहे. म्हणजे त्यामुळे सर्वांना सुधारायची चांगली संधी मिळते. म्हणतातच नां, "निंदकाचे घर असावे शेजारी." म्हणूनच समाज सुधारण्याच्या कामात मराठी माणसाचा हातखंडा आहे. भले आपण आणि आपले घर सुधारण्याचे तो विसरतो.