कोलबेर यांच्याशी "लोच्या" शब्दाबद्दल चर्चा झालेली आहे. जीवशास्त्रीय "वैविध्य" या कल्पनेसाठी डावखुरेपणाचे उदाहरण वापरले हे चांगलेच आहे.
- - -
वेगवेगळी मते येत आहेत.
गेल्या काही वर्षांत या चर्चाविषयातील "टोन" किंवा मुद्द्यांची पातळी बदलत आहे, असे मला जाणवते आहे. पैकी सलिल वाघ यांच्या मताए उद्धरण रोचक वाटले. सलिल वाघ यांचे मानववंशशास्त्रीय शोध अचाट आहेत. इंग्रजांमध्ये समलिंगी संबंधांची प्रथा खलाशी असण्यामधून उत्पन्न झाली, वगैरे मुद्दे गमतीदार आहेत.
>समलिंगी संबंध हे गौरवाचे आहेत किंवा सक्तीचे आहेत असा निकाल अजून दिलेला नाही.
मजा आहे. न्यायालय कुठले निकाल देऊ शकते, आणि कुठले निकाल देऊ शकत नाही याबद्दल श्री. वाघ यांच्या मोठ्या रम्य कल्पना असाव्यात.
> या ओल्या दुष्काळातून रुचिवैचित्र्यासाठी समलिंगी संबंध ठेवणार्या कडव्या स्त्रीपुरुषांच्या टोळ्या निर्माण झाल्या.
मस्त! कोरड्या दुष्काळचा मुद्दासुद्धा वाघ यांच्याच बाजूचा. ओल्या दुष्काळाचा मुद्दाही वाघ बाजूचा. प्राचीन भारतात समलिंगित्वाचे उल्लेख दिसले तरी ते वाघ यांच्याच पथ्यावर. अन्यत्र दिसले तरी ते वाघ यांच्याच बाजूचे. निरीक्षण काहीही उलटसुलट असो, निष्कर्ष तोच! ("कोकरा ओढ्याच्या वरून किंवा खालून तू माझे पाणी गढूळ करतो आहे. शिवाय तू माझा अपमान केला आहे. तुझे वय नाही तर तुझ्या बापाने माझा अपमान केला आहे," असे लांडगा म्हणतो. कोकरू खाण्याचा निष्कर्ष ठरलेला आहे, तर मग उलटसुलट मुद्द्यांचा काहीच विधिनिषेध नसतो.)
(डीजे = [अन्यत्र] धनंजय)