जयंतरावांच्या त्या कार्यक्रमाचा वृत्तांत कधीपासून मागत होतो. आज वाचायला मिळाला. अत्यंत सुंदर लेख तर झाला आहेच. पण, जयंतरावांचे मनापासून हार्दिक अभिनंदन! मला स्वतःला त्यांच्या गजलांमध्ये खालील वैशिष्ट्ये जाणवतात.

१. अनावश्यक शब्द नसणे
२. शैली इतरांहून बरीच भिन्न असणे
३. लहान बहरींवर प्रभुत्व
४. विषयांचे वैविध्य

त्याशिवाय, जयंतरावांचा आंतरजालावरील वावर अत्यंत सुखद असतो.

त्यांच्या या कार्यक्रमाने व गजलांच्या माध्यमातून 'मराठी गजल' या काव्यप्रकाराला एक उत्तम योगदान मिळेल यात शंका नाही.

अजून अनेक दशके त्यांच्या नवनवीन गजलांचा स्वाद घेण्याची इच्छा व्यक्त करतो.

ही सी. डी. कुठे मिळेल व मूल्य कुठे पाठवायचे ते कृपया कळवावे.

पुन्हा अभिनंदन!