लेख फार आवडला. काही कॉमेंटस!

१. आपण सौ. विमलाबाई गरवारेमध्ये होतात काय? आमच्याही शाळेत अशाच मुला-मुलींमध्ये स्वयंघोषित मर्यादा आखून दिलेल्या असायच्या. बोलणे-बिलणे म्हणजे पापच होते. ( मला असा संशय आहे की माझी ऍडमिशन झाल्यानंतर असे अलिखित नियम अस्तित्वात आले असावेत. )

२. दादाभाई नवरोजी हा फारच सुंदर प्रकार वाटला.

३. राखी देवस्थळी - आपण असा जाहीर उल्लेख केला आहेत ते योग्य आहे काय?

४. पेस्ट्रीला लाजवणाऱ्या राख्या - उत्तम उल्लेख!

५. कॉलेजात असताना शेवटच्या वर्षात एकुलत्या एक वेळेला प्रेमात पडलो होतो. ही बया आपल्याला आता राखी बांधते की काय, अशी प्रचंड भीती त्या वर्षीच्या राखीपौर्णिमेला होती! पण सुदैवानं तसं काही झालं नाही. आणि तसं झालं असतं, तरी फरक पडला नसता, हे कॉलेज संपल्यानंतर उमगलं.

या उताऱ्याचा शेवट फार आवडला.

अजून लेख लिहावेत अशी विनंती!

चित्र सुंदर आहे.