तुमचा प्रतिसाद आणि मार्गदर्शन मोलाचं आहे माझ्यासाठी . त्यासाठी मनः पूर्वक धन्यवाद.
वृत्त ही अशी गोष्ट आहे की कुण्याही कवीला किंवा कवयित्रीला प्रयत्नपूर्वक ह्या गोष्टीवर हुकमत मिळवता येते. मार्गदर्शनाची गरज नसते. शालेय जीवनात वृत्तांचा केलेला अभ्यास पुरेसा असतो. आणि तुम्ही तर मुक्तछंदातल्या एवढ्या छान कविता लिहिता. तुम्हाला तर अजिबातच नाही. फक्त आळस न करता चुका टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत राहा. लिहीत राहा. कविता नामक सुंदरीच्या डोक्यातला लिखा दाखवण्याचे काम (इंग्रजीतले निटपिकिंग) तेवढे आम्ही करू शकतो. आणि आम्ही ते करत राहू.