माझेही वैयक्तिक मत असेच आहे. आक्षेप घेणारे म्हणतात की हे 'डे' साजरे करणे ही परदेशी पद्धत आहे. म्हणून ती आपल्याकडे नको. आपली संस्कृती रोज आई-वडिलांचे पाय धरण्याची आहे.त्यामुळे मातृदिन किंवा पितृदिन साजरा करण्याची गरज नाही. पण किती जण रोज हे करतात? मैत्रीदिन साजरा केल्यानेच मैत्री होते का? पण मला असे वाटते की मैत्री किंवा प्रेम हे दिन साजरे केल्याने होत नाही पण आपण राखी पण वर्षातून एकदा बांधतो. मग बाकीच्या दिवशी काय बहिण बहिण नसते? आपण वर्षातून एकदा आपला वाढदिवस पण साजरा करतोच की नाही? तसेच हे. मैत्री जरी कायमची असली तरी एखाद्या दिवशी ती व्यक्त करायला काहीच हरकत नसावी. एक मात्र आहे की या कोणत्याही 'साजरे' करण्याला बीभत्सता येऊ नये. कारण आपल्या संस्कृतीत कोणतेही नाते पवित्र मानले जाते.  असो! प्रतिसादाबद्दल धन्यवाद.