मानस६, ही माहिती इथे दिल्याखातर धन्यवाद.
या समारंभाला उपस्थित राहण्याचे सौभाग्य मलाही लाभले होते.
इथेच आणखीही एका विशेष गोष्टीचा उल्लेख करणेही आवश्यक आहे.
ती म्हणजे, जयंतरावांच्या गझलसंग्रहासोबतच त्यांचा लोकसंग्रहही यावेळी दिसून आला!
जयंतराव अभियंते/कवी तर त्यांच्या पत्नी वृंदा ऍडव्होकेट. गझलेच्या आणि जीवनाच्या 'कायद्यां'तून वाट काढत जयंतरावांनी आपल्या वैवाहिक जीवनाचा रौप्यमहोत्सव साजरा केला त्याचे औचित्य साधूनच त्यांनी हा गझलांच्या प्रकाशनाचा सोहळा आयोजित केलेला होता. आम्ही सर्व उपस्थितांनी त्यांच्या सर्वार्थाने समृद्ध जीवनाचे हार्दिक अभिनंदन करून अनेकानेक शुभ्रेच्छाही व्यक्त केल्या होत्या. आज सर्व मनोगतींच्या वतीनेही मी त्या उभयतांचे, इथे, या निमित्ताने अभिष्ट चिंतितो.
ज्या सामाजिक बांधिलकीच्या भावना आजच्या समाजातून लुप्तप्राय होत चालल्या आहेत त्या सर्वार्थाने पुन्हा उजागर करणारा असा तो सोहळा होता. मला व्यक्तीशः उपस्थित राहून त्यांचा लोकसंग्रह पाहण्याची संधी दिल्याखातर मी जयंतरावांचाही ऋणी आहे.
त्यांच्याच शब्दांना थोडे वळवून म्हणायचे तरः
बहर येत होते, बहर जात होते
कृतार्थ होत होते, जयंतराव ते