ंत मुळे होणारी अर्थहानी सप्तमीच्या अनेकवचनाच्या प्रत्ययामुळे होते. त्यामुळे वृत्तांत म्हणजे वृत्तांमध्ये की इतिवृत्त असा गोंधळ होऊ शकतो. मात्र हे जर शब्दाच्या आत येत असेल तर असा गोंधळ होण्याची शक्यता नाही. उदा 'वृत्तांतामुळे' किंवा 'वृत्तांतकथन' असे लिहिले तर ते चुकीचे वाटू नये. असा विचार करून शब्दाचे शेवटी ान्त असे लिहिलेले असेल तर स्वयंसुधारक त्यात ांत असा बदल करणार नाही असा बदल/अपवाद आता स्वयंसुधारणेत समाविष्ट केलेला आहे.
ह्याचा परिणाम म्हणून आता वृत्तान्त लिहिले असेल तर त्यात स्वयंसुधारक बदल करणार नाही. (मात्र वृत्तान्तकथन असे लिहिले तर वृत्तांतकथन असा बदल नेहमीप्रमाणे करीलच.)
तरीही अधिक तपासण्या करून ह्या विषयी नक्की निर्णय घ्यावा लागेल.