मी सगळे प्रतिसाद वाचून उत्तर देत आहे.
मुंबईत ते जमण्याचे कारण म्हणजे मुंबई हे नुसतेच बंदर नसून ते 'महाराष्ट्रात आहे, जिथे मराठी लोक राहतात, ज्यांना परभाषिक लोक आले तरीही आधी फायद्यासाठी सामावू घेण्याची व नंतर बोंब मारण्याची कला अवगत आहे.
हे आणि 'मराठी माणसाने मुंबईची काळजी घेतली नाही' हे म्हणणे पटले नाही. मुंबई विकसित झाली तीच मुळी इंग्रज म्हणजे परकीयांमुळे. ती विकसित झाली त्यामुळे उद्योगधंदे तिथेच आधी आले आणि मग तिथे नोकरी मिळवायला सगळ्या भारतातून नोकरवर्ग तिथे आला. अमेरिकेत जसे सगळे आले कामासाठी तसेच. आता यात मराठी माणसाचा काय बरं दोष? आता स्वतःची कामं दुसऱ्याने घेतल्यावर जसे अमेरिकन लोक बोंबलतात तशीच मराठी माणसं बोंबलतात. मला नाही वाटत यात कुणाची चुक आहे.
फार छान आहे लेख. मुंबई मलाही पहिले अशीच बकाल वाटली होती आणि आता जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी मुंबईच्या ट्रेनची आठवण आल्याशिवाय राहत नाही.