खूप महत्त्वाचा विषय तुम्ही खूप छान मांडला आहे. लेखाच्या शेवटचा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असावा, आणि त्यांच्याही बाबतीत, तो ठराविक काल संपला की ते पाणी-बचत धोरण वगैरे सगळंच संपत असावं. (हे मी माझ्यावरून सांगतोय.. )

इकडे चेन्नई मध्ये प्यायचं पाणी सुद्धा जेव्हा विकत घ्यावं लागतंय, तेव्हा पाण्याची खरी किंमत कळतीये.
रेन वॉटर हार्वेस्टिंग - ह्या शब्दानेच बहुतेक सगळा उलगडा होतो हल्ली. तुम्ही ह्या विषयात, मराठी- इंग्रजी चा मुद्दाही सफाईदारपणे मांडलात.
पुढील लेखनास अनेक शुभेच्छा !