नकारात्मक विचारः भारतात सार्वजनिक आरोग्याची अवस्था अत्यंत वाईट आहे.
होकारात्मक विचारः भारतात विविध रोगांना बळी पडलेल्या रुग्णांची संख्या प्रचंड असल्याने अशा रोगांना प्रतिकार करणाऱ्या व अशा रोगांचा मुकाबला करणाऱ्या औषधांची निर्मिती व त्यांच्या चाचण्या (क्लिनिकल ट्रायल्स) व त्यांतून निर्माण होणारे रोजगार यांना भारतात प्रचंड संधी उपलब्ध आहे
न. वि.: भ्रष्टाचार, सामाजिक जाणिवेबाबत उदासीनता, स्वार्थीपणा यांनी भारतीय समाज नुसता बरबटलेला आहे.
हो. वि.: अशा गोष्टींचा अतिरेक झाला की त्यातूनच क्रांती होते, असे इतिहास सांगतो.
न. वि. : भारतीय लोक अधिकाधिक भांडकुदळ होत आहेत.
हो. वि. : टीमवर्कच्या ' फॉर्म -स्टॉर्म-नॉर्म-परफॉर्म' या पायऱ्या आहेत. त्यातले 'स्टॉर्मिंग' फार महत्त्वाचे. वादविवाद नसले तर ते सुस्त उदासीनतेचे लक्षण आहे. 'दी बिगेस्ट ट्रॅजेडी ऑफ लव्ह इज इनडिफ्रन्स! '
थोडक्यात अकबर बिरबलाची गोष्ट. 'तुमचे सगळे नातेवाईक तुमच्या डोळ्यांसमोर मरतील' आणि 'तुम्ही तुमच्या सर्व नातेवाईकांपेक्षा अधिक जगाल!'