कथा / लेख अजिबात आवडली नाही. सतत दुसऱ्याचं डोमेन नॉलेज चोरून त्यावर आधारित नवीन काहीतरी फुटकळ बांधण्यातच सॉफ्टवेअरवाले धन्यता का मानतात? वरील कथेतही पिढ्यानपिढ्या चालत आलेली, लहानमुलांना प्रामाणिकपणाची शिकवण देणारी चांगली कथा ढापून ती मोडून संपूर्ण अप्रामाणिकपणाची शिकवण देणारी करून वर त्याला कलियुगाचा महिमा असा मुलामा देण्यात आलाय. यात काय मोठेपणा आहे? याला विनोद म्हणावं तर तोही अगदीच किरकोळ प्रतीचा आहे. विडंबन म्हणूनही याला काही फारसा दर्जा नाही.
लॅपटॉप पाण्यात पडला म्हणून जी कंपनी कामगाराला बढती देते अशी कंपनीही फक्त सॉफ्टवेअरचीच असू शकते. अतिशय स्वस्त प्रमाणात मिळणाऱ्या देशी कामगारांमुळे असले वेडाचार करायला या कंपन्यांकडे भरपूर पैसे असतात. या अशा अर्थहीन मेल्सचं प्रमाण आजकाल फारच बोकाळलंय.