आशावादी (अर्थात होकारात्मक विचार करणारा) मनुष्य आणि निराशावादी (अर्थात नकारात्मक विचार करणारा) मनुष्य यांच्या दृष्टिकोनांतील सूक्ष्म फरक समर्पकपणे दर्शवून देणारी एक (ऐकीव) व्याख्या:
'आशावादी मनुष्य आपण सर्व सर्वाधिक शक्य तितक्या उत्कृष्ट जगात जगतो असा डंका वाजवतो. निराशावादी मनुष्यास हे बहुधा खरे असावे अशी भीती वाटते.'
(वाईट भाषांतराबद्दल क्षमस्व. ज्यावरून भाषांतर केले तो मूळ इंग्रजी तर्जुमा पुढीलप्रमाणे: 'द ऑप्टीमिस्ट प्रोक्लेम्ज़ दॅट वी लिव इन द बेस्ट ऑफ ऑल पॉसिबल वर्ल्डज़; अँड द पेसिमिस्ट फियर्स दिस ईज़ ट्रू.')
(थोडक्यात, दोघांचेही अंतिम म्हणणे एकच. फक्त त्या अंतिम म्हणण्याकडे पाहण्याच्या दोघांच्या दृष्टिकोनात सूक्ष्म फरक आहे, इतकेच.)