मी तज्ञ नाही, तरी सार्स व स्वाईन फ्ल्यू ह्या दोन्ही संसर्गजन्य रोगांच्या हल्ल्याला सामना कराव्या लागणाऱ्या ठिकाणी राहतो, तेव्हा जे काही माहिती आहे, ते सर्वसाधारण व्यक्तिच्या दृष्टिकोनांतून लिहीत आहे.

स्वाईन फ्ल्यूची लक्षणे साध्या फ्ल्यू बरीचशी सारखीच असली तरी काही बाबतीत फरक आहे. स्वाईन फ्ल्यू मध्ये घसा धरतोच. आणि महत्त्वाचा फरक म्हणजे स्वाईन फ्ल्यूत उच्च स्वरूपाचा ताप (High fever) असतो, तो पॅनॅडॉलने कमी होत नाही, साध्या फ्ल्यूचे तसे नसते.

स्वाईन फ्ल्यूचे वैशिष्ट्य हे की त्याचे जीवाणू फुफुसांत वाढू शकतात, व तेथील स्नायूंवर हल्ला करून ते त्यांना कमजोर करतात. त्यामुळे खोकला व श्वासोश्वासास त्रास ही लक्षणेही चढत्या प्रमाणात असतात.  

रक्ततपासण्यांनी स्वाईन फ्ल्यू आहे किंवा नाही, हे तज्ञांना समजू शकते. त्या वेळीच झालेल्या बऱ्या. वेळीच उपाययोजना करून स्वाईन फ्ल्यूवर (अद्यापतरी) मात करता येते.